बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : अंदमान व निकोबार बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरात पुढील काही दिवसांमध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता सोमवारी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे या चक्रीवादळाविषयीची माहिती आयएमडीने दिली आहे. दक्षिण अंदमान समुद्र व मलक्काच्या सामुद्रधुनीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

तो पश्चिम-वायव्य क्षेत्राकडे सरकल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरातही त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यानंतर हा कमी दाबाचा पट्टा आग्नेयकडे सरकेल आणि पुढील ४८ तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.