Weight Loss Tips: खूप प्रयत्नाने वजन कमी केले तरी ते पुन्हा पुन्हा वाढते? फक्त ‘या’ गोष्टी करा,पुन्हा नाही वाढणार वजन

Ajay Patil
Published:
weight loss tips

Weight Loss Tips:- वाढते वजन ही समस्या आता अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. वाढत्या वजनामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात व यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब तसेच डायबिटीस यासारख्या आजारांचा आपल्याला समावेश करता येईल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बरेच जण अनेक प्रकारचे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात.

एक्सरसाइज पासून तर डायटिंग यासारख्या अनेक गोष्टींचा अवलंब केला जातो. बरेच प्रयत्न करून वजन कमी केले जाते. परंतु हे कमी झालेले वजन जास्त दिवस मेंटेन करता येत नाही व परत वजन वाढायला लागते व वाढत्या वजनाची समस्या त्रासदायक ठरला लागते.

त्यामुळे मोठ्या कष्टाने कमी केलेले वजन पुन्हा वाढू नये याकरिता तुम्ही काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून वजन कमी झाल्यानंतर पुन्हा ते वाढणार नाही या दृष्टिकोनातून या गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 या गोष्टींवर लक्ष दिल्यामुळे नाही वाढणार कमी केलेले वजन

1- वजन कमी करताना आपण ज्या काही गोष्टी अवलंबतो जसे की आपण वजन कमी करण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करतो. परंतु वजन कमी झाले की बरेच जण व्यायाम करणे सोडतात व या ठिकाणीच मोठी चूक होते. तुम्हाला जर कमी झालेले वजन मेंटेन करायचे असेल तर तुम्हाला सतत क्रियाशील राहणे गरजेचे आहे व रोज शारीरिक हालचाली करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण यामुळे तुमच्या कॅलरी बर्न होतात व मसल्स मास मेंटेन राहते.

2- बरेच जण वजन कमी झाल्यानंतर डाइट सोडतात व जे हवे ते खायला लागतात. परंतु ही देखील एक मोठी चूक आहे. यामध्ये तुम्ही वजन कमी करताना जो काही डाएट आणि खाण्याच्या सवयी स्वतःला लावलेल्या होत्या त्या कायम ठेवणे गरजेचे आहे. खाण्यामध्ये तुम्ही भरपूर प्रकारची फळे तसेच भाज्या, वेगळे धान्य आणि हेल्दी फॅट्स खाणे गरजेचे आहे. याशिवाय शुगर असलेली ड्रिंक्स, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ व प्रोसेस्ड फुड्स हे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. तसेच वजन कमी करताना आपण बाहेरील खाणे जसे की फास्ट फूड किंवा जंक फूड टाळतो व वजन कमी झाल्यानंतर देखील अशा पद्धतीचे खाणे टाळणे गरजेचे आहे.

3- तसेच कमीत कमी दररोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. कमी झालेले वजन जर तुम्हाला मेंटेन करायचे असेल तर पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. कारण झोपेचा अभाव राहिला तर हार्मोनल संतुलन बिघडू शकते व सारखी सारखी भूक लागू शकते.भूक लागल्याने व्यक्ती काहीतरी खाते व याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो.

4- तसेच पाणी हे शरीरासाठी व आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असल्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यावर जर शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत असेल तर त्याचा विपरीत परिणाम चयापचयावर होतो. वजन कमी करण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी पीत राहिले तर तुमची भूक नियंत्रणामध्ये राहते व तुम्ही आपसूकच जास्त खाणे टाळतात.

5-महत्त्वाचे म्हणजे कमी केलेले वजन तुम्हाला मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही वजन कमी करताना ज्या निरोगी सवयींचे पालन करत होतात त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे.सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुमच्या ज्या सवयी तुम्हाला फायद्याच्या ठरल्या त्या वजन कमी झाल्यानंतर देखील कायम ठेवणे खूप गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe