तुमच्या गावात मनरेगाची कोणती कामे सुरू आहेत ? तपासा अगदी घरबसल्या ! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ajay Patil
Published:

Marathi News : ग्रामीण भागामध्ये अनेक विकासाची कामे चालू असतात व यामध्ये जर आपण मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विचार केला तर या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे बांधणे तसेच फळबागांची लागवड इत्यादी स्वरूपाची कामे केली जातात. परंतु बऱ्याचदा आपल्याला आपल्या गावामध्ये या योजनेचे म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कोणती कामे सुरू आहेत व त्यांची सध्याची स्थिती काय आहे?

इत्यादी बद्दल माहिती होतं नाही. परंतु तुम्हाला जर या कामांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अगदी घरबसल्या देखील ती तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात. याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

तुमच्या गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे स्टेटस अशा पद्धतीने बघा

1- याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला नरेगा(nrega)असं गुगलवर सर्च करावे लागेल. त्यानंतर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट अशा नावाचे एक पेज ओपन होते व या पेजवर क्लिक केले की मनरेगाचे पेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसते.

2- या पेजवर डाव्या बाजूला पंचायत हा एक पर्याय असतो व त्यावर तुम्हाला क्लिक करायचे असते.

3- त्यानंतर एका नवीन पेजवर तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पंचायत असे तीन पर्याय दिसतात. या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4- त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन कॉलम तुमच्यासमोर ओपन होतो व त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जनरेट रिपोर्ट्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

5- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर देशातील संपूर्ण राज्यांची नावे त्या ठिकाणी ओपन होतात व यातील महाराष्ट्र या नावावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या नावावर क्लिक केल्यानंतर ग्रामपंचायत मॉड्युल नावाचे नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होते.

6- या ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला अगदी सुरुवातीला आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शिअल इयर मध्ये आर्थिक वर्षाची निवड करायची आहे व त्यानंतर जिल्हा, तालुका आणि मग गावाचे नाव निवडायचे आहे.

7- ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुम्हाला प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे. 8- प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर ग्रामपंचायत रिपोर्ट्स नावाचे एक पेज तुमच्यासमोर ओपन होते व यावर R1, R2, R3, R4, R5 आणि R6 अशाप्रकारे कॉलम दिलेले असतात.

8- यातील R5 या कॉलम मधील लिस्ट ऑफ वर्क या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे व त्यानंतर वर्क एक्सपेंडीचर नावाचे एक पेज ओपन होते.

9- या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला कामाचा प्रकार निवडायचा आहे व तुमच्या गावातल्या सगळ्या कामांचे स्टेटस जाणून घ्यायचं असल्यास ऑल हा पर्याय निवडायचा आहे.

10- यानंतर तुम्ही वर्क स्टेटस या पर्याय समोर तुम्ही कोणती कामे नवीन सुरू आहेत किंवा किती कामांना मंजुरी मिळाली व किती पूर्ण झाली इत्यादी माहिती या ठिकाणी पाहू शकतात. जर तुम्हाला ही सगळी माहिती एकदाच पहायची असेल तर तुम्ही ऑल या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

11- अगदी शेवटी तुम्ही फायनान्शिअल इयर या कॉलम मधील ऑल या रकान्यासमोर क्लिक केले की तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या गावातील गेल्या वर्षातील मनरेगाच्या कामांची यादी दिसते.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील मनरेगाच्या कामांची स्थिती पाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe