मोठी बातमी ! ‘या’ स्मार्टफोनमध्ये 1 जानेवारी 2025 पासून Whatsapp चालणार नाही, तुमचा फोन तर नाही ना यात, पहा…

नवीन वर्षाच्या आधीच व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात काही स्मार्टफोन मध्ये व्हाट्सअप चालणार नाही. मेटा या कंपनीने व्हाट्सअप च्या नियमाने मध्ये काही बदल केलेले असून हे बदल नवीन वर्षात लागू होणार आहेत.

Tejas B Shelar
Published:
Whatsapp News

Whatsapp News : सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आणि सोशल मीडियाचे युग. प्रत्येकच जण सोशल मीडियाचा वापर करतो. ज्याच्याकडे स्मार्टफोन त्याच्याकडे सोशल मीडिया. व्हाट्सअप, instagram, youtube सारख्या अनेक सोशल मीडिया एप्लीकेशनचा आपण वापर करतो.

दरम्यान नवीन वर्षाच्या आधीच व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात काही स्मार्टफोन मध्ये व्हाट्सअप चालणार नाही. मेटा या कंपनीने व्हाट्सअप च्या नियमाने मध्ये काही बदल केलेले असून हे बदल नवीन वर्षात लागू होणार आहेत.

मेटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच निवडक अँड्रॉइड फोनवरून त्यांच्या सेवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या निवडक स्मार्टफोनवर नवीन वर्षात व्हाट्सअप चालणार नाही.

१ जानेवारी २०२५ पासून, १० वर्षांपूर्वीची ऑपरेटींग सिस्टम (OS) किंवा जुन्या आवृत्त्यांवर चालणाऱ्या विविध अँड्रॉइड डिव्हाइसेसवर व्हॉट्सॲप सपोर्ट करणार नाही, अशी घोषणा कंपनीकडून नुकतीच करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आता आपण एक जानेवारी 2025 पासून कोणकोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअप चालणार नाही याचा आढावा घेणार आहोत. जर आम्ही सांगितलेला स्मार्टफोन तुम्हीही वापरत असाल तर तुमच्याही स्मार्टफोनमध्ये नवीन वर्षात व्हाट्सअप चालणार नाही याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे.

या स्मार्टफोन मध्ये एक जानेवारी 2025 पासून व्हाट्सअप चालणार नाही

सॅमसंग (Samsung) : Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini

मोटोरोला (Motorola) : Moto G (1st Gen), Razr HD, Moto E 2014

एचटीसी (HTC) : One X, One X+, Desire 500, Desire 601

एलजी (LG) : Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90

सोनी (Sony) : Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V

वर सांगितलेल्या मॉडेलपैकी एखादा मॉडेल तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या कुटुंबात असेल तर या मॉडेलमध्ये नवीन वर्षात व्हाट्सअप चालणार नाही. बाकी सर्व मोबाईल मध्ये मात्र व्हाट्सअप आधीप्रमाणेच काम करणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe