बाईक आणि बऱ्याचशा पेट्रोल इंजिन असलेल्या कार्स आणि इतर वाहनांना ऑपरेट करण्यासाठी प्रामुख्याने पेट्रोलची गरज भासते. आपण पेट्रोल पंपावर जातो व वाहनामध्ये पेट्रोल भरतो व वाहन चालवतो. आपण जेव्हा पेट्रोल पंपावर जातो तेव्हा नेमके आपण कोणत्या प्रकारचे पेट्रोल भरत आहोत? हे आपल्याला प्रामुख्याने माहीत नसते.
पेट्रोलमध्ये देखील अनेक प्रकार असतात व प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी योग्य पेट्रोल निवडणे देखील गरजेचे असते. याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते.
परंतु जर आपण पेट्रोलच्या बद्दल माहिती घेतली तर पेट्रोलचे अनेक प्रकार असतात व वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांकरिता योग्य पेट्रोलची निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते व ते वाहनाच्या इंजिनच्या कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. या अनुषंगाने या लेखामध्ये पेट्रोलचे मुख्य प्रकार किती असतात व त्यांची माहिती थोडक्यात बघू.
पेट्रोलचे प्रकार व त्याची थोडक्यात माहिती
1- नियमित पेट्रोल( ऑकटेन रेटिंग: 87)– हा जो काही पेट्रोलचा प्रकार आहे हा सर्वात स्वस्त आणि सामान्य प्रकार समजला जातो. या प्रकारचे पेट्रोल सामान्य कारमध्ये वापरले जाते व त्यासोबतच लहान व मध्यम श्रेणीचे जे काही इंजिन आहे त्यासाठी हा प्रकार योग्य आहे. या प्रकारच्या पेट्रोलचा फायदा बघितला तर कमी किमतीत आणि सर्वसामान्य कारसाठी हे पेट्रोल योग्य असते. जर कारची इंजिन उच्च कार्यक्षमता किंवा टर्बो चार्ज केलेले असेल तर हे पेट्रोल अशा कारसाठी योग्य समजले जात नाही.
2- प्रीमियम पेट्रोल(ऑकटेन रेटिंग: 91)- हा पेट्रोलचा प्रकार लक्झरी किंवा स्पोर्ट कार इत्यादी वाहनांमध्ये वापरला जातो. ज्यांची उच्च इंजिन कार्यक्षमता असते अशा वाहनांसाठी हे पेट्रोल डिझाईन केलेले आहे. जर आपण प्रीमियम पेट्रोलचे फायदे बघितले तर सुधारित इंजिन परफॉर्मन्स आणि इंजिनचे आयुष्य वाढवण्यासाठी फायद्याचे ठरते. या प्रकारचे पेट्रोल मात्र नेहमीच्या पेट्रोलपेक्षा महाग असते.
3- मिड ग्रेड पेट्रोल(ऑकटेन: 89)- या प्रकारच्या पेट्रोलचा वापर हा प्रामुख्याने वाहनासाठी सामान्य आणि प्रीमियम दरम्यान ऑकटेन आवश्यक आहे अशा वाहनांसाठी फायद्याचा आहे. पेट्रोलच्या ऑकटेन रेटिंग मधून चांगला परफॉर्म मिळतो.परंतु पेट्रोलच्या प्रीमियम प्रकारापेक्षाही स्वस्त असते. परंतु या प्रकारचे पेट्रोल सर्व कारसाठी उपयुक्त नसते आणि बहुतेक लोक सामान्य किंवा प्रीमियम पेट्रोल निवडतात.
4- इथेनॉल मिश्रित पेट्रोल– या प्रकारच्या पेट्रोलमध्ये दहा टक्के, पंधरा टक्के किंवा 85 टक्के पर्यंत इथेनॉल असते. या प्रकारचे पेट्रोल इंधन खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणास उपयुक्त किंवा अनुकूल असते. या प्रकारच्या पेट्रोलचा वापर केला तर प्रदूषणाची समस्या कमी व्हायला मदत होते व किंमत देखील कमी असते. परंतु या प्रकारचे पेट्रोल सर्वच वाहनांसाठी उपयुक्त नसते. जुनी कार असेल तर त्यासाठी या प्रकारचे पेट्रोल योग्य नसते.
कारसाठी पेट्रोलचा कोणता प्रकार चांगला ठरतो?
1- नियमित पेट्रोल– सरकारच्या मॅन्युअल मध्ये 87 किंवा त्यापेक्षा कमी ऑकटेन वापरण्याची शिफारस केली असेल तर हे पेट्रोल चांगले ठरते.
2- प्रीमियम पेट्रोल– इंजिनला उच्च परफॉर्मन्सची गरज असेल तर मॅन्युअल मध्ये 91 ऑकटेन व त्यापेक्षा जास्त गरज असेल तर प्रीमियम पेट्रोलचा वापर फायद्याचा ठरतो.
3- मिड ग्रेड पेट्रोल– जर तुमच्या कारला 89 ऑकटेनची गरज असेल किंवा तुम्हाला चांगला परफॉर्मन्स हवा असेल तर तुम्ही मीड ग्रेड पेट्रोलचा वापर करू शकता.
4- इथेनॉल मिश्रित पेट्रोल– जर तुमची कार इथेनॉल मिश्रित इंधनाला सपोर्ट करत असेल व तुम्हाला पर्यावरणाला अनुकूल पेट्रोल वापरायचे असेल तर हे पेट्रोल तुमच्या कारसाठी योग्य ठरते.