पाथर्डीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा! घरावरील पत्रे उडाले, कांदा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी- बुधवारी (७ मे २०२५) दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले, आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहोज देवढे गावच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना … Read more

कोपरगावात अवकाळी वादळासह पावसाचा कहर! विजेचे खांब पडले, पत्रे उडाली, झाडे कोसळली शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यात मंगळवारी (दि. ६) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचीच तारांबळ उडाली. वादळामुळे झाडे कोसळली, विजेचे खांब वाकले, घरांवरील पत्रे उडाली, तर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आर्थिक नुकसान मात्र प्रचंड … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. कांदा उत्पादनात … Read more

पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! शेतकऱ्यांचे पत्रे उडाले, झाडे पडली आणि फळपिकांचे झाले अतोनात नुकसान

पारनेर- गुरुवारी सायंकाळी पारनेर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने वनकुटे, पठारवाही, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, तास या गावांना जबरदस्त फटका बसला. पावसाच्या जोरदार सरी आणि वाऱ्याच्या झंझावातामुळे शेतपिके उध्वस्त झाली. कांदा, वाटाणा, गहू, आंबा, डाळींब या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भाजीपाला व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा पिकांचे नुकसान वादळामुळे आंब्याच्या बागांतील … Read more

अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले, पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

अहिल्यानगर: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्यापावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन … Read more