अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. कांदा उत्पादनात … Read more

अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव घसरले, सध्या प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?, अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला बसला तडाखा

नेवासा- तालुक्यातील घोडेगाव कांदा उपबाजारात सध्या कांद्याचे दर आठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, तर दुसरीकडे बाजारभावात झालेली ही घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंता बनली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा साठवणुकीचा प्रश्न गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या वादळ व गारपिटीमुळे … Read more

अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले, पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

अहिल्यानगर: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्यापावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन … Read more