राहता तालुक्यातील वाकडी-दिघी रोडवर पुन्हा बिबट्या जेरबंद, परिसरात भीती तर शेतकऱ्यांनी केली बंदोबस्ताची मागणी

राहाता- तालुक्यातील वाकडी-दिघी रोड परिसर सध्या बिबट्यांच्या दहशतीखाली आहे. गुरुवारी (१७ एप्रिल) रात्री वाकडी-धनगरवाडी परिसरातील बाळासाहेब शेळके यांच्या शेतात तीन बिबटे पिंजऱ्याजवळ फिरताना दिसले. यापैकी एक बिबट्या भक्ष्याच्या आमिषाने पिंजऱ्यात अडकला आणि जेरबंद झाला. अवघ्या दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबट्या पकडला गेला होता, आणि आता पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. … Read more