गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान, अद्याप पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात रविवारी (४ मे २०२५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, ऊस यांसारख्या पिकांसह घरांचे आणि विद्युत यंत्रणेचेही नुकसान झाले. पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचा … Read more