केतकी चितळेविरूद्ध नाशिकमध्ये गुन्हा, आणखी एक तरुण अडकला

Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर वादात सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यानंतर आता नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकच्या एका युवकाविरूद्ध अशाच एका प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चितळे हिच्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तिला अटकही करण्यात आली आहे. … Read more