अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव घसरले, सध्या प्रति क्विंटल मिळतोय एवढा भाव?, अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला बसला तडाखा

नेवासा- तालुक्यातील घोडेगाव कांदा उपबाजारात सध्या कांद्याचे दर आठशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, तर दुसरीकडे बाजारभावात झालेली ही घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंता बनली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा साठवणुकीचा प्रश्न गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या वादळ व गारपिटीमुळे … Read more

राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास निर्सगाने हिसकावला!

राहुरी- तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या गारपीटयुक्त वादळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे. म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगाव थडी व आसपासच्या गावांमध्ये जोरदार वाऱ्याबरोबर गारपीट झाल्याने कांदा, केळी, मका, चारा पिके आणि गहू यांना फटका बसला. शेतकरी आपल्या पिकांची काढणी करून विक्रीसाठी सज्ज झाले असतानाच निसर्गाच्या या अवकाळी कोप्याने सर्व मेहनत वाया गेली आहे. … Read more