कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सोडण्याची खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी कुकडी प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवन कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. … Read more

मळगंगा देवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची चिंता मिटली, कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय

पारनेर- निघोज येथील मळगंगा देवी यात्रेसाठी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० तारखेपासून पुष्पावती नदीपात्रात पाणी सोडून कपिलेश्वर बंधारा भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यात्रेदरम्यान पाण्याचा प्रश्न सुटणार असून, लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे. पाण्याची टंचाई निघोजच्या मळगंगा … Read more