Electronic Soil:- अनेक प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे शेती क्षेत्राचा खूप झपाट्याने विकास होताना आपल्याला दिसून येत आहे.जगाच्या पाठीवर इस्रायल सारख्या देशांनी तर शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे व याच तंत्रज्ञानाचा वापर जगातील इतर देशांनी देखील कृषी क्षेत्रामध्ये केलेला आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक कामे करणे सोपे तर झालेच परंतु कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे देखील शक्य झालेले आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीत आता वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे अनेक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होताना दिसतो.
यामध्ये जर आपण विचार केला तर शेतीसाठी माती हा एक आवश्यक घटक असून मातीशिवाय पिकांची वाढ शक्य होत नाही. शेतामधील माती जितकी सुपीक असेल तितके ते पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी महत्त्वाचे असे असते.
याच महत्त्वाच्या असलेल्या मातीशी निगडित स्वीडन या देशातील वैज्ञानिकांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून त्यांनी चक्क इलेक्ट्रॉनिक माती तयार केली आहे. स्वीडन येथील एका वैज्ञानिक आणि या संदर्भातला प्रयोग करून दाखवला आहे. त्यामुळे या लेखात आपण या इलेक्ट्रॉनिक माती बद्दल आवश्यक माहिती बघणार आहोत.
स्वीडनच्या वैज्ञानिकांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वीडन येथील वैज्ञानिकांनी इलेक्ट्रॉनिक माती तयार केली असून यासंबंधीचा प्रयोग या देशातील एका वैज्ञानिकाने करून दाखवला आहे. ही माती म्हणजे एक मिनरल न्यूट्रियंट सोल्युशन असून यामध्ये सामान्य मातीच्या तुलनेत पिकांची वाढ तब्बल पन्नास टक्के जास्त होत असल्याचा दावा देखील या वैज्ञानिकांनी केला आहे.
स्वीडन मधील लिंकपिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. या पद्धतीने शेती करण्याच्या प्रक्रियेला हायड्रोपोनिक्स असे देखील म्हटले जाते. यामध्ये मातीचा वापर न करता सोल्युशनच्या माध्यमातून पिके वाढवली जातात. हे ऍक्टिव्हेट करण्याकरिता विजेचा वापर यामध्ये होतो व त्यामुळेच याला इलेक्ट्रॉनिक्स सॉईल असे म्हटले जाते.
सध्या या प्रक्रियेचा वापर अनेक ठिकाणी शेती करण्यासाठी करण्यात येत आहे व या प्रक्रियेच्या माध्यमातून पिकांना जे काही आवश्यक पोषक तत्वे लागतात ते मिनरल न्यूट्रिएंट सोल्युशन च्या माध्यमातून दिली जातात. यामध्ये पिकांना एका विशिष्ट सबस्ट्रेटवर लावले जातात व पुढे या सब स्ट्रेटमध्ये वीज प्रवाहित केली जाते
व यामुळे हे सोल्युशन ऍक्टिव्हेट होते. या प्रक्रियेमध्ये जेव्हा रोपे इनॲक्टिव्ह असतात तेव्हा या प्रक्रियेमुळे ते ऍक्टिव्ह होतात व त्यांची मुळे वेगाने पोषक द्रव्य शोषायला लागतात व यामुळे पिकांची वाढ वेगात होते.
पिकांच्या उत्पादनासाठी अशा नवनवीन प्रक्रिया आता समोर येत असल्यामुळे येणाऱ्या कालावधी त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होईल अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे या इलेक्ट्रॉनिक्स सॉइल प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता भासणार नाही व माती देखील असण्याची गरज नाही.