भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन असून यामध्ये अनेक कंपन्यांनी नवनवीन असे स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत. अगदी याच पद्धतीने आजकालच्या तरुणाई मध्ये क्रेझ असलेल्या एप्पलने देखील भारतात आयफोन १६ सिरीज नुकतीच लॉन्च केली असून यामुळे कंपनीने आयफोन 14, आयफोन 14 प्लस आणि आयफोन 15 व आयफोन 15 प्लस मध्ये दहा हजार रुपयापर्यंत किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे आयफोन चाहत्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण असून किमतींमध्ये कपात केल्यामुळे अनेकजण आता या सणासुदीच्या कालावधीत आयफोन खरेदी करू शकता.
परंतु सध्या काही प्रकरणे बघितली तर ओरिजिनल आयफोन सारखेच सेम टू सेम बनावट आयफोनच्या प्रकरणांमध्ये देखिल सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण कष्टाने कमावलेला पैसा देऊन जर आयफोन खरेदी करत असाल तर तो आयफोन नकली आहे की खरा हे ओळखणे खूप गरजेचे आहे.
या टिप्स वापरा आणि ओळखा आयफोन नकली आहे की खरा?
1- सगळ्यात अगोदर आयएमईआय नंबर चेक करणे– आयफोन जर खरा असेल तर त्यामध्ये आयएमईआय नंबर हा असतोच. हा नंबर जर तुम्हाला शोधायचा असेल तर त्याकरता तुम्हाला आयफोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल व त्या ठिकाणी जनरल हा पर्याय निवडावा.
त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या अबाउट या पर्यायावर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करत जावे. त्या ठिकाणी तुम्हाला आयएमईआय नंबर दिसतो. जर हा नंबर किंवा सिरीयल नंबर नसेल तर तो आयफोन नकली असण्याची शक्यता असू शकते.
2- ऑपरेटिंग सिस्टीम तपासणे– बहुदा आयफोन मध्ये iOS ऑपरेटिंग सिस्टम वापरलेली असते व ही ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड पेक्षा वेगळ्या पद्धतीचे असते.तुम्ही विकत घेत असलेल्या आयफोन मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे
हे चेक करण्यासाठी त्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे आणि नंतर सॉफ्टवेअर टॅब निवडावी. खऱ्या आयफोन मध्ये सफारी, हेल्थ आणि iMovie सारखे ॲप्स असतील.
3- आयफोनची बांधणी पाहणे– जो आयफोन बनावट किंवा नकली असतो त्याची बांधणी स्वस्त अशा मटेरियल पासून केलेली असते व त्याची डिझाईन देखील मूळ आयफोनपेक्षा वेगळी असते.
यामध्ये फ्रेम,नॉच आणि कॅमेरा मॉड्युल यांची माहिती घ्यावी. कारण मूळ आयफोनमध्ये बहुतेक नवीन मॉडेल्स धातू आणि काचे पासून बनवलेले असतात व त्यामुळे त्यांचा लूक हा एक प्रीमियम पद्धतीचा असतो. त्यामुळे बांधणी म्हणजेच त्या फोनची मूळ डिझाईन पाहणे गरजेचे आहे.
4- आयफोनची सेटिंग तपासणे– आयफोन घेताना त्याची सॉफ्टवेअर ची माहिती तसेच स्टोरेज क्षमता, आयएमईआय नंबर आणि इतर सेटिंग व्यवस्थित तपासून घ्यावी.
तुम्हाला या सर्व बाबींवरून आयफोनची सत्यता तपासता येऊ शकते. शक्य असेल तर जवळच्या एप्पल स्टोर मध्ये जाऊन तुम्ही घेतलेला आयफोन तपासू शकता.