Under Sea Tunnel:- भारतामध्ये अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरू आहे व त्यासोबतच बुलेट ट्रेन सारखा महत्त्वाचा प्रकल्प देखील सुरू आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवणे व औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण अशा पायाभूत सुविधांची उभारणी या माध्यमातून साध्य करण्यात येत आहे.
या प्रकल्पांमध्ये जर आपण बघितले तर मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेच.परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला महत्वकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू असून नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून या पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्याकरिता अत्याधुनिक स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असून या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण बारा स्थानके असणार आहेत
व यामध्ये महाराष्ट्रातील चार स्थानकांचा समावेश आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये जर बघितले तर या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातील पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येत असून या बोगद्यातून ताशी 320 किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.
तयार होत आहे 21 किमी लांबीचा समुद्रा खालून बोगदा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो. सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून या बुलेट ट्रेन मार्गावर अरबी समुद्राखालून जाणारा देशातील पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे व या बोगद्यातून ताशी 320 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.
समुद्र खालून बोगदा तयार करणे हे आव्हानात्मक काम असून याकरिता टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग मेथड यांचा वापर करण्यात येत आहे. तर या तंत्रज्ञानाचा वापर बघितला तर तो प्रामुख्याने विदेशामध्ये सध्या केला जातो व हेच तंत्रज्ञान सध्या हा बोगदा तयार करण्यासाठी वापरण्यात येत आहे.
मुंबईमधील घणसोली तसेच शिळफाटा व विक्रोळी या परिसरामध्ये मशिनरीद्वारे हे काम सुरू करण्यासाठी खोदकाम होणार आहे. साधारणपणे या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
हा एक सिंगल ट्यूब बोगदा असणार असून या बुलेट ट्रेनला येण्या आणि जाण्याकरिता दोन ट्रॅक असणार आहेत. हा बोगदा मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान असणार आहे.
कसा आहे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग?
मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गीकेवर एकूण बारा स्थानके असणार असून यामध्ये महाराष्ट्रातील चार स्थानकांचा समावेश असणार आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर पूर्ण करण्यासाठी तीन तासांचा वेळ लागणार आहे.
या बुलेट ट्रेन मार्गावर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या स्थानकांचा समावेश आहे. गुजरात मधील वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद व साबरमती या स्थानकांचा समावेश असणार आहे. साधारणपणे 2026 या वर्षापासून बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे.
या मार्गावर नदीवर 24 पूल बांधण्यात येणार आहेत व त्यातील 20 पूल गुजरात मध्ये आणि चार महाराष्ट्रात आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर फक्त 127 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.