Monsoon Rain News: मान्सूनची वाटचाल जोरात! महाराष्ट्रातील ‘या’ भागासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आणि या भागात वाढणार पावसाचा जोर

Ahmednagarlive24
Published:
m

खरीप हंगामाची सुरुवात, चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. परंतु गेल्या एक ते दोन दिवसापासून  राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस होत असल्यामुळे सगळीकडे समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

त्यातच हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीचा विचार केला तर त्यानुसार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आपण हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या पावसाचा अंदाज बाबत माहिती घेऊ.

 पावसाळा विषयी हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विचार केला तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि इतर कोकण पट्ट्यातील भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून  या भागासाठी देखील तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क रहावे असे देखील सांगण्यात आले आहे.

तसेच पुढचे 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.  रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच विदर्भातील भंडारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असून नागपूरला देखील रात्रीपासून रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे. नागपूर हवामान विभागाकडून पुढचे 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

 देशातील सध्या मान्सूनची स्थिती

मान्सूनने देशाचा बहुतेक भाग व्यापला असून मागील चार दिवसांमध्ये मान्सूनने वेगाने प्रगती केली आहे. मान्सूनच्या प्रगतीला पोषक हवामान असल्यामुळे मान्सूनचा प्रवास सुकर झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर मान्सूनने व्यापले होते.

कालचा विचार केला तर मान्सूनने उत्तर अरबी समुद्राचा बहुतेक भाग, संपूर्ण गुजरात राज्य आणि राजस्थानाच्या बहुतेक भागात प्रगती केली आहे. मान्सूनची सीमा आज जोधपूर, सिकर, नरनौल आणि फिरोजपुर पर्यंत होती. पोषक हवामान असल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून राजस्थानचा उर्वरित भाग व्यापण्याची शक्यता असून पंजाब आणि हरियाणाच्या संपूर्ण भागात दाखल होईल. म्हणजेच मान्सून संपूर्ण भारत व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe