सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ झालेली दिसून येत असून अंगाची लाही लाही करणारा उकाडा जवळजवळ संपूर्ण राज्यात जाणवत आहे. परंतु या उष्णतेच्या कालावधीत अवकाळी पावसाचा जोर देखील बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे.
जरा साधारणपणे आपण राज्यातील जिल्ह्यांचे सरासरी तापमान पाहिले तर ते 40° च्या पुढे असून राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा चार ते सहा डिग्री अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रचंड असा उकाडा आणि अवकाळीचा जोर या दुहेरी संकटामुळे नागरिक त्रस्त झाल्याची स्थिती आहे. साधारणपणे अजून किती दिवस उष्णतेचे लाट जाणवू शकते? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
किती दिवस राहील राज्यात उष्णतेची लाट?
राज्यामध्ये सध्या कुठे प्रचंड प्रमाणात उन्हाचा चटका जाणवत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. दरम्यान संपूर्ण विदर्भात तसेच खानदेशातील नंदुरबार, धुळे तसेच जळगाव, मराठवाडा व नाशिक तसेच अहमदनगर यासारख्या 24 जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा चार ते सहा डिग्री सेल्सिअसने वाढणार असून ते 40 ते 44 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
परंतु विशेष म्हणजे अशा स्थितीमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. साधारणपणे पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार दिनांक 25 मे पर्यंत राज्यात उष्णतेचे लाटेची स्थिती जाणवू शकते असे देखील माणिकराव खुळे यांनी सांगितले. तसेच देशात पुढील तीन दिवस गुजरात राज्य आणि मुंबईचा कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहून त्यासोबत दमट उष्णतेची स्थिती जाणवेल.
या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता
राज्यामध्ये सध्या उष्णतेचे लाट सदृश्य स्थिती असली तरी महाराष्ट्रात 25 मे पर्यंत ढगाळ वातावरण आणि त्यासोबत तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. आज आणि उद्या म्हणजेच 23 आणि 24 मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवेल अशी माहिती देखील माणिकराव खुळे यांनी दिली.
मराठवाडा आणि विदर्भातील १९ जिल्ह्यांमध्ये 24 मे पासून अवकाळीचे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. परंतु मुंबई तसेच कोकण, खानदेश व नाशिक, सातारा,सांगली,कोल्हापूर, अहमदनगर आणि पुणे या ठिकाणी मात्र 24 मे नंतर देखील अवकाळीचे वातावरण राहील अशी स्थिती आहे.
तसेच मान्सून हा अंदमान या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याची पुढे आगेकूच कायम असून या आठवड्या दरम्यान कदाचित बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती देखील निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे.