Top Mutual Fund:- जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण गेल्या नऊ महिन्यांमध्ये काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना तब्बल 15 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर काही फंडांनी थोडा तोटा देखील अनुभवला आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी या फंडांची कामगिरी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
टॉप 5 फंडांनी दिला 15% पेक्षा जास्त परतावा

ईटी म्युच्युअल फंड्सच्या आकडेवारीनुसार, एकूण 279 फंडांपैकी फक्त 5 फंडांनी 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यामध्ये सर्वात उत्तम कामगिरी फोकस्ड फंड्सनी केली आहे.यात
1-ICICI Prudential Focused Equity Fund – 16.59% परतावा
2-Kotak Focused Equity Fund – 15.81% परतावा
फोकस्ड फंड म्हणजे असे फंड जे मर्यादित कंपन्यांमध्ये किंवा काही विशिष्ट क्षेत्रांमध्येच गुंतवणूक करतात. त्यामुळे अशा फंडांमध्ये नफ्याची शक्यता जास्त असते, पण धोका देखील तितकाच असतो.
मिड आणि लार्ज कॅप फंडांचा चांगला परफॉर्मन्स
मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.जसे की Invesco India Midcap Fund – 15.30% परतावा
Helios Large & Mid Cap Fund – 15.22% परतावा,Invesco India Large & Mid Cap Fund – 15.08% परतावा दिला आहे.हे फंड त्यांच्या समतोल पोर्टफोलिओमुळे स्थिर आणि आकर्षक रिटर्न देत आहेत.
इतर नामांकित फंडांची स्थिती
ICICI Prudential Flexi Cap Fund ने 14.47% परतावा दिला आहे व त्यासोबतच ICICI Prudential ELSS Tax Saver Fund – 12.48% परतावा,ICICI Prudential Midcap Fund – 12.25% परतावा आणि ICICI Prudential Large & Mid Cap Fund ने 12.15% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.तसेच मोठ्या कंपन्यांवर आधारित फंडांपैकी Kotak Large Cap Fund (10.79%) आणि PGIM India Large Cap Fund (10.68%) यांनी गुंतवणूकदारांना स्थिर परतावा दिला आहे.
मिडकॅप आणि फ्लेक्सी कॅप फंडांची झेप
मिडकॅप फंडांमध्येही गुंतवणूकदार खुश आहेत. जसे की Kotak Midcap Fund ने 9.97% परतावा दिला तर Kotak Mahindra Midcap Fund ने 9.95% परतावा दिला.तसेच सर्वात मोठा फ्लेक्सी कॅप फंड, Parag Parikh Flexi Cap Fund, सध्या 9.25% परतावा देत आहे.
मल्टी-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांचे निकाल
मल्टी-कॅप फंडांनी मध्यम पातळीचा परतावा दिला.त्यात ICICI Prudential Multicap Fund ने 7.38%,HDFC Multicap Fund ने 7.29% तर SBI Contra Fund ने 5.52% आणि Edelweiss Multicap Fund ने 5.51% परतावा दिला आहे.स्मॉल-कॅप फंडांमध्ये SBI Small Cap Fund ने फक्त 2.30% परतावा दिला, ज्यामुळे या विभागात थोडी कमकुवत कामगिरी दिसली आहे.