अहमदनगर :- पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.
त्यासाठी १२ एप्रिलचा ‘मुहूर्त’ ठरला असून डाॅ. सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभेत हा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दाेघेही विखेंच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल आहेत.
तसेच पुत्र सुजय विखे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पक्षात त्यांची होणारी घुसमट जगजाहीर आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस चे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पोस्टर वर स्टार प्रचारक असलेल्या राधाकृष्ण विखे यांचा फोटो नसल्याने एकाच खळबळ उडाली.
सुजय विखे यांच्या प्रवेशापूर्वी जिल्हा भाजपा पदाधीकार्याना कोनातीच कल्पना नव्हती.
आणि आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबत पण आजूनही कोणत्याच पदाधीकार्याना काहीच कल्पना नसल्याचे समजते.
- लॉटरीत मिळालेलं म्हाडाचे घर विक्रीबाबत नियम काय आहेत ? वाचा सविस्तर
- मुंबईहुन ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहरात सुरू झाली ई – बाईक टॅक्सी सेवा, ‘या’ 3 कंपन्यांना मिळाले तात्पुरते परवाने, भाडे किती असणार?
- यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली
- नवीन व्यवसाय सुरू करायचाय ? मग 3 लाख रुपयांमध्ये मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करा, पहिल्या दिवसापासून होणार कमाई