श्रीगोंदा :- दोन मालमोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता मढेवडगाव येथे घडली.
नगर-दौंड रस्त्यावर बसस्थानकाशेजारी गव्हाचे पोते भरलेली मालमोटार (आरजे ०९ जीडी १६१९) उभी होती. गाडीला रिफ्लेक्टर नसल्याने पाठीमागून आलेल्या बटाटा भरलेल्या मालमोटाराची (आरजे ११ जीए ६१७०) तिला जोरदार धडक बसली.

या अपघातात क्लीनर रामलखन प्रीतमसिंह बघेल(वय २४, पिपुरवा, जि. ढोलपूर, राजस्थान) हा जागीच ठार झाला, तर चालक अमित मिश्रा (वय ३२) जखमी झाला.
दोन्ही गाड्यांतील गहू व बटाट्याचे मोठे नुकसान झाले. दोन्ही गाड्या राजस्थान येथील होत्या. पहाटे अपघात झाल्याने वेळेवर मदत पोहोचू शकली नाही.
गावकऱ्यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
अपघातग्रस्त गाडी रस्त्यावरच असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.पोलिसांनी क्रेन आणून गाडी बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत चालू झाली.
- Post Office Scheme : या योजनेत 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 23 हजार 508 रुपयांचे व्याज, वाचा सविस्तर
- हवामान खात्याचा भीतीदायक अंदाज खरा झाला ! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी, पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार
- मुंबईकरांना मिळणार नव्या मेट्रोमार्गाची भेट ! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोच्या नकाशावर झळकणार
- सापांची भीती वाटते का ? मग घरात ‘हे’ औषधी तेल असायलाच हवे, सापांचा धोका होणार कमी
- 3 वेळा बोनस शेअर देणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! एक लाखाचे झालेत एक कोटी