अमरावती : शेतात रखवालदार म्हणून काम करणाऱ्या दारूड्या पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. क्रौर्याची परिसीमा गाठून पत्नीच्या गुप्तांगात काठी ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना नजीकच्या धोतरखेडा शेतशिवारात आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी क्रूरकर्मा पतीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू तोटा चढोकार (५०) रा.कामीदा, भैसदेही असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे तर रूख्मा विष्णू चढोकार (४५) असे मृतक पत्नीचे नाव आहे.

परतवाडा येथील रहिवासी दिपेश अग्रवाल यांच्या मालकीच्या धोतरखेडा शिवारातील शेतात चढोकार दाम्पत्य गेल्या दोन महिन्यांपासून रखवालदार म्हणून कामाला होते. शेतातील झोपडीतच ते दोघे राहत होते. गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी चढोकार दाम्पत्य बाजारातून खरेदी करून झोपडीवर परतले. यावेळी मद्यधुंद अवस्थेत विष्णूने पत्नी रूख्मा यांच्यासोबत वाद घातला.
या वादातून त्याने पत्नीला काठीने अमानुष मारहाण केली. विष्णू एवढ्यावरच थांबला नाही. दारूच्या नशेत त्याने पत्नी रूख्मा यांच्या गुप्तांगात काठी ठेचून त्यांची हत्या केली. रात्रभर रूख्मा ह्या रक्ताच्या थारोळ्यात शेतातील झोपडीमध्ये पडून होत्या.
पती विष्णूही त्याठिकाणी बसला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बाजूच्या शेतातील रखवालदार विष्णू चढोकारच्या झोपडीजवळ गेला. यावेळी त्याला रूख्मा ह्या झोपडीत मृतावस्थेत आढळून आल्या.
- लॉटरीत मिळालेलं म्हाडाचे घर विक्रीबाबत नियम काय आहेत ? वाचा सविस्तर
- मुंबईहुन ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहरात सुरू झाली ई – बाईक टॅक्सी सेवा, ‘या’ 3 कंपन्यांना मिळाले तात्पुरते परवाने, भाडे किती असणार?
- यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली
- नवीन व्यवसाय सुरू करायचाय ? मग 3 लाख रुपयांमध्ये मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करा, पहिल्या दिवसापासून होणार कमाई