जर तुम्ही स्मार्टफाेन खरेदी करण्याची याेजना आखत असाल तर या सणासुदीच्या हंगामात तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या वर्षात सणासुदीच्या काळात सॅमसंगपासून Apple पर्यंत आणि शाओमीपासून व्हिवाेपर्यंत अनेक बड्या कंपन्या नवीन फाेन बाजारात आणणार आहेत.
वेगवेगळ्या अहवालानुसार या मंदीच्या वातावरणातही स्मार्टफाेन कंपन्या ७५ नवीन स्मार्टफाेनचे माॅडेल्स बाजारात आणण्याची तयारी करीत आहेत. इंडस्ट्री इंटिलिजन्स ग्रुपचे प्रमुख प्रभू राम म्हणाले, दरवर्षी स्मार्टफाेनच्या आयातीमध्ये ८ ते १० टक्के वाढ हाेईल.

स्मार्टफाेन ब्रँड्सने आकर्षक ऑफर दिल्याने ग्राहकांचे स्वारस्य वाढले आहे. सणासुदीच्या काळात स्मार्टफाेनच्या अनेक बड्या कंपन्यांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी उत्सुक आहेत.
एकीकडे शाओमी रेडनाेट ८ आणि ८ प्राे लाँच करण्याची याेजना आखत आहे तर सॅमसंग एम सिरीजअंतर्गत लाँचिंगची तयारी सुरू केली आहे.
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, आता महिलांना …..
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% कधी होणार ? 3% DA वाढीबाबत समोर आली मोठी अपडेट
- पैसाच पैसा….; 2026 मधील संपूर्ण 12 महिने ‘या’ राशीच्या लोकांची चांदी होणार, शनी देवाच्या कृपेने मिळणार जबरदस्त यश!
- लातूर – कल्याण महामार्ग ‘या’ 6 जिल्ह्यांमधून जाणार ! कोणत्या गावांमधून जाणार नवा मार्ग ? समोर आली मोठी अपडेट
- पैशांची चिंता सोडा! एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि आयुष्यभर मिळवा 100000 रुपये पेन्शन