बेळगाव : वडील आपल्याला पबजी खेळू देत नाहीत, याचा राग आल्याने चिडलेल्या एका निर्दयी मुलाने चक्क जन्मदात्या वडिलांवर हल्ला चढवत त्यांचे तुकडे करून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे कर्नाटकातील बेळगावधील काकती येथे घडली आहे.
याप्रकरणी रघुवीर कुंभार नामक तरुणास अटक केली आहे.कर्नाटकातील बेळगावमधील काकती येथे असलेल्या सिध्देश्वरनगरात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत रघुवीर पबजी गेम खेळत बसला होता. यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल ठेव असा सल्ला दिला.

परंतु यानंतरही तो हा गेम खेळतच राहिला. तेव्हावडिलांनी त्याच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला. यानंतर रागाच्या भरातच रघुवीर झोपण्यासाठी गेला. त्याने प्रथम आई झोपलेल्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली आणि तिला कोंडले.
यानंतर घरात असलेल्या विळ्याने वडिलांवर हल्ला चढवला. त्याचा राग इतका अनावर झाला होता की त्याने रागाच्या भारत वडिलांचे तीन तुकडे केले. मृत वडिलांचे नाव शंकर देवाप्पा कुंभार असल्याचे कळते.रघुवीर हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता.
त्याचे शिक्षणात लक्ष लागत नव्हते. मोबाईल गेमच्या सवयीमुळे तो तीन वेळा नापास झाला होता. यामुळे आई-वडील खूप दु:खी होते. रघुवीरचे वडील पोलीस दलातून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले होते. रघुवीर हा सतत नापास होत असल्याने बेरोजगार होता.
त्यामुळे तो घरीच बसून मोबाईलवर गेम खेळत असे. अशातच वडीलही सेवानिवृत झाले होते. तेही घरी बसून रहात, तेव्हा त्यांना मुलगा फक्त गेम खेळताना दिसायचा. यावरून अनेकदा मुलगा आणि वडिलांत भांडणेही होत होती. या भांडणाचा शेवट सोमवारी वडिलांच्या हत्येने झाला आहे.
- म्हाडा पुणे मंडळाच्या 6,168 घरांसाठी अर्ज सुरु, किती अनामत रक्कम भरावी लागणार ? वाचा…
- पीसी ज्वेलर्सचा शेअर खरेदी करणे ठरेल फायद्याचे? 1 आठवड्यात दिला 13.84 टक्क्यांचा घसघशीत परतावा
- 1 महिन्याच्या गुंतवणुकीने दिला 21.83% परतावा! वोडाफोन-आयडियाचा शेअर आज करणार कमाल…तज्ञांची रेटिंग काय?
- ONGC Share Price: 5 वर्षात 217.21% तेजी! आज मात्र मोठी घसरण…BUY करावा का? बघा तज्ञांचा सल्ला
- नवरात्र उत्सवात खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढणार! किती रुपयांनी होणार वाढ? वाचा…