राहुरी : तालुक्यातील कणगर येथील गर्भवती महिला गुहा ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच प्रसूत झाल्याची घटना काल (दि. १५) नऊ वाजता घडली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या समयसूचकतेमुळे गर्भवती माता व नवजात बालकाचे प्राण वाचले.
असे असले तरी महिला सहाव्यांदा गर्भवती असताना कणगर ते लोणी असा प्रवास केला केला जात होता असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील कणगर येथील जया यशवंत आढाव या महिलेला रविवारी सकाळच्या दरम्यान प्रसव वेदना सुरू झाल्या.
नातलगांनी तिला लोणी येथील पीएमटी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला व तात्काळ १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. गर्भवती महिलेला घेऊन रुग्णवाहिका लोणीकडे निघाली असता रस्त्यातच तिला प्रसववेदना सुरू झाल्या.
महिला सहाव्या खेपेची गर्भवती असल्याने पाणमूठ लवकर फुटली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत रुग्णवाहिका लोणी येथे न नेता गुहा येथील ग्रामीण रुग्णालयात आणली. मात्र, प्रवेशद्वारातच महिला बाळंत झाली.
बाळंतीणीने गोंडस मुलाला जन्म देताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, कणगर ते लोणी हा प्रवास का सुचविण्यात आला, महिला सहाव्यांदा बाळंत असल्याने कणगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, अथवा राहुरी फॅक्टरी येथे दाखल करता आली असताना लोणीला नेण्याचा अट्टाहास का करण्यात आला. गुहाचे ग्रामीण रुग्णालय नसते तर काय असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
- शक्तिपीठ महामार्गाचा रूट बदलला जाणार ! ‘हे’ तालुके वगळले जातील, कसा असणार याचा रूट?
- चांदीच्या दरवाढीबाबत मोठं भाकीत! 300000 रुपयांचा टप्पा गाठणार, नव्या भविष्यवाणीने जगभरातील ग्राहकांमध्ये खळबळ
- आनंदाची बातमी ! आता मुंबईतून पुण्याला जाताना लोणावळा खंडाळा घाटातुन जाण्याची गरज नाही, इथं तयार होतोय नवा महामार्ग
- Tata करणार मोठा धमाका ! टाटा समूहाची नामांकित कंपनी ‘या’ जिल्ह्यात उभारणार देशातील सर्वात मोठा कारखाना, हजारो हातांना मिळणार रोजगार
- महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात विकसित होतोय आणखी एक राष्ट्रीय महामार्ग ! भविष्यात राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून थेट…..












