श्रीगोंदा : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असले तरी अजूनही मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून जप्ती कारवाई करण्यात येत आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे.
- NMDC Share Price: 3 महिन्यात 15.53% परतावा… आज खरेदी करावा का? वाचा तज्ञांची रेटिंग
- Gensol Share Price: 1 महिन्यात 14.16% रिटर्न… गुंतवणूकदार झाले लखपती! आजची पोझिशन काय?
- ATGL Share Price: शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण! अदानी ग्रुपचा ‘हा’ शेअर मात्र रॉकेट…कमाईची संधी?
- पोस्ट ऑफिसची 5 वर्षांची खास योजना ! अकाउंट ओपन केल्यानंतर लगेचच मिळणार दरमहा 5 हजार 500 रुपयांचे व्याज
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत