अहमदनगर : आपल्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे मोबाईल टावर बांधण्याचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्सुरन्स करावयाचे असल्याचे सांगून, शिवाजी घोरपडे यांना विविध बँकांमध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून,३० लाख ३५ हजार ५३१ रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत सविस्तर असे की, डॉ.शिवाजी बाबूराव घोरपडे (रा.शिराळ चिचोंडी) यांना राजीव माथूर (पूर्ण नाव माहित नाही),अमित त्रिपाठी, राजीव मल्होत्रा, राजेंद्र यादव, राजीव नारायण शर्मा,चमन अग्रवाल,निर्मल शर्मा, विशाल शर्मा (पूर्ण नाव माहित नाही).

यांनी संगनमत करून डॉ.घोरपडे यांना तुमच्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे टावर बांधायचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्शुरन्स उतरावा लागेल.असे सांगून घोरपडे यांना विविध बॅकांच्या खात्यात वेळोवळी पैसे भरण्यास भाग पाडले.
डॉ.घोरपडे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ऑगस्ट २०१५ ते २० ऑगस्ट २०१९ या काळात विविध बँकाच्या खात्यात एकूण ३० लाख ३५ हजार ५३१ रूपये भरले.वरील आठ जणांनी हे सर्व पैसे काढून घेतले तसेच अद्यापही आपल्या जागेवर टावर उभे करण्याच्या कोणत्याही हालचाली होत नसल्याचे लक्षात आल्याने डॉ.घोरपडे यांना आपल्या फसवल्याचे लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी याबाबत पाथर्डी पोलिसांत वरील आठजणांविरूध्द फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पवार हे करत आहेत.
- पुढील 5 दिवसात लाडक्या बहिणींना मिळणार योजनेचे पैसे ! महिला व बाल विकास विभागाकडून मोठी माहिती
- 360 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे झालेत दुप्पट! आता कंपनी देणार बोनस शेअर्स, कंपनीकडून किती मोफत शेअर्स मिळणार ? वाचा…
- घर खरेदीचे स्वप्न होणार स्वस्तात पूर्ण! ‘या’ बँकेकडून होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात, ५० लाखांच्या कर्जासाठी किती पगार हवा ?
- महाराष्ट्रातून जाणारे ‘हे’ दोन महामार्ग एकमेकांना जोडले जाणार ! वाचा सविस्तर
- ……तर शिक्षकांना आपली नोकरी गमवावी लागणार ! राज्य शासनाच्या नव्या आदेशाने खळबळ