राहुरी – शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त गेले, तर भाजप सरकार महागाई वाढवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच देशात आर्थिक मंदी आली, असा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. राहुरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाडगेबाबा व्यापारी संकुल रस्त्यावर आयोजित सभेत पाटील बोलत होते.
ते म्हणाले, मागील निवडणुकीत राहुरीत दोन स्थानिक उमेदवार लढल्याने पराभवाची वेळ आली. मतदारसंघाला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन ताकद लावा. नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. लोक विचाराला महत्त्व देतात. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करावे. अमोल मिटकरी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बेरोजगारांना रोजगार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत नेमके काय केले. फडणवीस यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना हे चित्र मीडियात दाखवले जात नाही.

गोपीनाथ मुंडे असते, तर फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देणारे हे सरकार आहे. भाजपत निष्ठेला किंमत नाही, हे एकनाथ खडसे यांच्यावरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे अनेक गुन्हे दाखल असलेले उमेदवार, तर दुसरीकडे एकही गुन्हा दाखल नाही असे राष्ट्रवादीचे उमेदवार हे लक्षात घेऊन स्थानिक उमेदवार हवा की, पार्सल उमेदवार हवा हे ठरवा, असे आवाहन मिटकरी यांनी केले.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ