जगाच्या सात वर्षे मागे आहे हा देश

आदीस अबाबा : सध्या सर्वत्र २०१९ साल सुरू आहे. मात्र जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, तिथले लोक जगापेक्षा सात वर्षांनी मागे आाहे. या देशात अजूनही २०१२ साल चालू आहे. एवढेच नाही तर या देशात एक वर्ष १३ महिन्यांचे असते.

इथियोपिया एक मागासलेला देश आहे, केवळ आर्थिक बाततीच नाही तर काळाच्या बाबतीतसुद्धा. दहा लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची खास बाब म्हणजे जगातील सगळे देश १ जानेवारीला आपले नवीन वर्ष साजरे करतात. इथियोपियातील लोक मात्र ११ सप्टेंबरला नव्या वर्षाचे स्वागत करतात. त्यामागे एक खास कारण आहे.

इथियोपियावासीयांचे आपले स्वत:चे कॉप्टिक कँलेंडर असून त्यानुसार ते चालतात. दुसरीकडे जगातील सर्व देश एकच ग्रिगोरियन कॅलेंडरचे पालन करतात व त्यांचे सणही याच कॅलेंडरनुसार होतात. इथियोपियातील लोक असे समजतात की, येशू ख्रिस्ताचा जन्म सातव्या शतकात झाला होता.