आदित्य माझ्या मुलाप्रमाणे:राज

मुंबई : आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच आहे. त्यामुळे आदित्य असो किंवा अमित; जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचे? बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही त्यांचे म्हणणे उद्धव आणि माझ्यावर लादले नाही.

आमच्यावर असे संस्कार असतील तर मुलांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढण्यावर पाठराखण केली.