इस्लामाबाद : ‘पाकने आपला मार्ग बदलला नाही तर त्याचे विघटन होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही’, या भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाचा पाकने मंगळवारी निषेध केला.
‘भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हरियाणातील एका प्रचारसभेत पाकविषयी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो’, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

‘राजनाथ यांचे प्रक्षोभक विधान भाजपची पाकविरोधी ‘टोकाची महत्त्वाकांक्षा’ व ‘मानसिकता’ दर्शवणारे आहे. त्यांनी एका सार्वभौम देशाचे तुकडे करण्याची धमकी दिली आहे. त्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असून, जागतिक समुदायाने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे’, असे पाकने म्हटले आहे.
- सापांची भीती वाटते का ? मग घरात ‘हे’ औषधी तेल असायलाच हवे, सापांचा धोका होणार कमी
- 3 वेळा बोनस शेअर देणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! एक लाखाचे झालेत एक कोटी
- 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी भेट ! ‘ही’ मागणी होणार पूर्ण
- लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट
- ‘हे’ आहेत देशातील सर्वात महागडे वकील ! एका केससाठी किती फी घेतात ?