मुंबई :- पॉर्न स्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी ही चित्रपटातील तिच्या बोल्ड सिन्ससाठी प्रसिद्ध आहे. या बोल्ड दृश्यांवरून अनेकदा तिच्यावर टीका झाली.
मात्र यावेळी एका वेगळ्याच कारणावरून सनीला टीकेला सामोरे जावे लागले आहे. टीका करणाऱ्याने सनी लिओनीला चांगलेच फटकारले असून त्याने तिला ‘डर्टी’ देखील म्हटले आहे.

कोणा एका समाजोपयोगी कामाच्या निमित्ताने अभिनेत्री सनी लिओनी हिने एक चित्र काढत त्या चित्राच्या लिलावातून येणारी रक्कम रुग्णांसाठी दान केली.
पण, तिच्या या कृतीसाठी काढण्यात आलेलं चित्र पाहता तिच्यावर एका कलाकृतीची नक्कल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे सनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
सनीने काढलेले चित्र हे मलिका फावरे नावाच्या कलाकाराचे असून तिने तिचे चित्र कॉपी केल्याचा आरोप डाएट सब्या या इंस्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आल आहे.
फ्रेंच चित्रकार मलिका फाव्रेच्या कुंचल्याचून सनीने नक्कल केलेल्या चित्राचं मुळ रुप साकारण्यात आलं होतं. याविषयीची वाच्यता सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली.
‘डाएट सब्या’ नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सनीने काढलेलं चित्र आणि फाव्रे यांचं चित्र अशा दोन्ही कलाकृचींचा कोलाज करत त्यामध्ये किती साम्य होतं हे अधोरेखित करण्यात आलं.
चित्राची चोरी केल्याचा आरोप झाल्यानंतर सनीने देखील सारवा सारव केली आहे. ‘मला चित्र काढण्यासाठी त्या चित्राचा फोटो देण्यात आला होता. मी फक्त ते चित्र काढले आहे. मी ते पाहिले मला ते आवडले.
या चित्राच्या लिलावातून येणारे पैसे कर्करोगग्रस्तांना देण्यात येणार आहेत. त्याहून जास्त किंवा कमी असे काहीही नाही. माफ करा तुम्हाला हे आवडले नसेल’, असा रिप्लाय सनीने त्याच्या पोस्टवर दिला आहे.
- बाबा वेंगा यांच सोन्याच्या किमतींबाबत मोठ भाकित ! 2026 मध्ये एक तोळा सोन खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ 5 नियमात होणार मोठा बदल, मिळणार मोठे आर्थिक लाभ
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरातुन चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण !
- दसरा ते दिवाळीच्या काळात ‘या’ शेअर्समधून मिळालेत जबरदस्त रिटर्न ! 65 टक्के रिटर्न देणारे शेअर्स कोणते आहेत?