पुणे :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, योगेश शेटे, मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षण विभागाचे शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले,’ गोहत्येला प्रोत्साहन देणारे वक्तव्य दानवेंसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे योग्य नाही.

त्यांच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. याबाबत दानवेंचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.
- टाटा SUVचा जलवा कायम; जानेवारी 2026 मध्ये 70,222 गाड्यांची विक्री, नेक्सॉन-पंच आघाडीवर
- शेअर मार्केट पुन्हा लाल निशाणीत ! चार दिवसांच्या तेजीला ब्रेक; ‘या’ सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी विक्री
- लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; जानेवारी – फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? महिलांमध्ये संभ्रम
- ३० गुंठ्यात आल्याची शेती; १४ महिन्यांत साडेचार लाखांचा निव्वळ नफा, कोपरगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा
- भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 6 पेट्रोल आणि हायब्रिड कार्स; वाढत्या इंधनदरांत ग्राहकांसाठी फायदेशीर पर्याय













