प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करा

मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व व्यवसायातील प्रभावित कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘कम्युनिटी किचन’ हा उपक्रम राबवला जातोय.

ह्या उपक्रमात अधिक सुसूत्रता यावी, खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचावा व लोकांना ताजं अन्न मिळावं यासाठी प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्राद्वारे महानगरपालिकेस दिले आहेत.

श्री. शेख यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबईतील अतिसंवेदनशील भांगामध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी रमजानच्या महिन्यात  खजूर, फळे व दूध इत्यादी खाद्यपदार्थ महानगरपालिका व पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच देण्यात येत आहेत.

नागरिकांची भूमिकाही प्रशासनाला सहकार्य करण्याची असायला हवी. लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे व कोरोनाविरोधातल्या या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करावे.

x