सोनाली कुलकर्णीचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का ! सोनालीचा झाला साखरपुडा

मराठी इंडस्ट्रीमधील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

तिने तिच्या आयुष्यात एक खास वळण आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं साखरपुडा केलाय.

सोनालीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी खास फोटो पोस्ट केले.

त्या खाली लिहिलंय की, ‘आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला,

आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं…

आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…’, त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

कुणाल बेनोडेकर असं सोनालीच्या जीवनातील या खास व्यक्तिचं, तिच्या पतीचं नाव आहे.

साखरपुडा करत एका नव्या प्रवासाची सुरुवात करणारी ही जोडी आता कधी एकदा लग्नाची आनंदवार्ता सर्वांच्या भेटीला आणते याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे