सुखद बातमी : दक्षिणेतील हा तालुका झाला कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकुळ घातलेला आहे. मात्र आता अनेकजण कोरोनमुक्त झाले आहेत. कर्जत तालुक्‍यात देखील कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले होते.

यापैकी एका बालिकेसह सात जणांनी कोरोनावर मात केली. तर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र आता कर्जत तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण राहिला नाही.

यामुळे कर्जत तालुका कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासन व नागरिकांनी घेतलेल्या दक्षतेमुळे हे शक्‍य झाले. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या काळात कर्जत तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

मात्र लॉकडाऊन शिथील होताच मुंबई व पुणे येथून आलेलेआठ रुग्ण राशीन परिसरात आढळले. या रुग्णांवर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील एका बालिकेसह सात जणांनी कोरोनावर मात केली तर एक महिला दगावली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews