अकोले तालुक्यात पुन्हा तिघांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

काल नव्याने तालुक्यातील देवठाण येथील एक युवक व एक महिला तर खिरविरे येथील एक तरुण असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अकोले तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २०८ वर गेली आहे.

त्यापैकी 156 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. तर 47 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. तर अद्याप 47 व्यक्तींचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे.

काल आढळलेल्या तीन रुग्णांमध्ये तालुक्यातील देवठाण येथील 18 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला व खिरविरे येथील 28 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आतापर्यंत अकोले शहरा लगतच्या बाजार समिती जवळील चालक, चाकण येथे एका कंपनीत असणारा लहित गावी आलेला

व्यक्ती, केळी येथील वृद्ध, मोग्रस येथील वृद्ध व रविवारी राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील मूळ कोतूळ येथील असलेला तरुण अभियंता असे पाच जण करोनामुळे दगावले आहेत.

प्रशासनाने सर्वोतपरी काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे काम सुरु असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved