अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पुणे आणि कोकणात या उत्सवाचे विशेष महत्व आहे. या काळात गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
गणपती ही संघटनेची देवता आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. गणेशोत्सव काळात केले जाणार धार्मिक व्रत याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक व्रत आहे. गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला आहे, असा समज आहे. गणेश चतुर्थी व्रत श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर हे व्रत केले जाते.
नदीकिनारी जाऊन, स्नान करावं, हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करावं आणि नंतर नदीत विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात.
किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी धारणा आहे. प्रतिष्ठापना पूजा श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली जाते.
यामध्ये विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात.
’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात.
त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. गणेशोत्सव सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.
याकाळात गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपतीबाप्पांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करतात, देखावा उभारतात, मूर्तीची प्रतिष्ठापना, स्पर्धा, व्याख्यानमाला असे विविध उपक्रम आयोजित करतात.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













