‘ती’च्या प्रसूतीने वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा; भीती अन चिंताही…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे. अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली आहे.

येथे काम करायचे म्हणजे जीवाची भीती आणि पिंजरा लावून तिला पकडायचे झाले तर तिची व पिल्लांची ताटातूट होण्याची चिंता. आता अशा यापरिस्थितीमध्ये येथील कर्मचारी सध्या कामकाज करत आहेत. ६ ऑगस्ट रोजी या प्रकल्पात एका बिबिट्याने प्रवेश केल्यानंतर तिने चार पिलांना जन्म दिल्याचे लक्षात आले.

पिल्लांच्या संगोपणासाठी मादी बिबट्याचा या परिसरातील वावर प्रकल्पाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भिती आणखीच वाढली. त्यांनी वन विभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी आले. त्यांनी पिंजरा लावला. मात्र, त्यात बिबट्या अडकला नाही.

मात्र, असे करणे पिल्लांच्या दुष्टीने योग नसल्याने काळजी घेत काम करण्याचे सूचना वनविभागाने प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना केल्या. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दुपारी ४ नंतरच प्रकल्पात शुकशुकाट होतो. रात्रपाळीचे कर्मचारी कॅबिन बंद करून बसतात.

पंधरा दिवसांत मादी पिल्लांना घेऊन जाते. त्यामुळे प्रकल्पाचे गेट बंद न करता उघडे ठेवून त्यांना जाता येईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना वनविभागाने प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आता सर्वजण आई आणि पिल्लांच्या तेथून जाण्याची वाट पाहत आहेत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved