”तो’आजार भयानक; जिल्ह्यातील जनावरांचे दोन दिवसात सर्वेक्षण करा’

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील चार गावांमध्ये आढळलेला जनावरांमधील लंपी स्किन डिसीज या आजाराबाबत जिल्ह्यातील इतर तालुक्यांनी सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करावा,

अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिल्या. जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे.

कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे.

जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून कोरोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे. हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो.

या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही पोहचली आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, कालवड, वासरे, वळू यांच्यावर लंपी स्कीन डिसीज संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाला आहे.

आता हा रोग औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून जिल्ह्यात शिरकाव करू पाहत आहे. त्या आधीच त्याला जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.

यामुळे नेवासा तालुक्यातील बाधित असणार्‍या गोधेगाव आणि परिसरातील पाच किलो मीटर अंतरावरील गावांतील 3 हजार 400 जनावरांचे तातडीने लसीकरण करण्यात

येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी काल दिली होती. दरम्यान, शुक्रवारी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची ऑनलाइन सभा सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व जनावरांना लाळखुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.

सर्व जनावरांना कानाला बिल्ले मारण्यात येऊन लसीकरणाची नोंद ईनाफ प्रणालीवर ऑनलाईन करन्याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved