तुळजापूर येथे बाहेरील नागरिकांना येण्यास प्रतिबंध

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- महाराष्‍ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षी दिनांक 17 ऑक्‍टोबर 2020 ते 1 नोव्‍हेंबर 2020 या कालावधीत साजरा होत आहे.

महोत्‍सव कालावधीत भाविकांचे गर्दीमुळे कोरोना साथीच्‍या प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी या उत्‍सवात होणारे धार्मिक विधी आवश्‍यक असलेले पुजारी, महंत, सेवेधारी व मानकरी यांचेच उपस्थितीत करावयाचे ठरलेले आहे.

नवरात्र महोत्‍सवाचे कालावधीत कोणत्‍याही भाविकास तुळजापुर शहरात प्रवेश दिला जाणार नाही. उक्‍त नवरात्र महोत्‍सवाचे कालावधीत बाहेरील जिल्‍ह्यातुन येणार्‍या भाविकांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर असते.

तुळजापुर शहरात कोणत्‍याही भाविकास प्रवेश दिला जाणार नसल्याने बाहेरील जिल्ह्यातील भाविकांनी तुळजापूर येथे येऊ नये, असे आवाहन जिल्‍हाधिकारी, उस्‍मानाबाद तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्‍थान, तुळजापुर यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास प्रतिसाद देत तुळजापूर येथे जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved