नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  नववर्षाला आता केवळ काही तसंच अवधी शिल्लक राहिला आहे. तसेच जानेवारी मध्ये संक्रांतीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात असतो.

दरम्यान यंदाच्या वर्षी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान श्रीरामपूर मध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत.

परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांजासह प्लॅस्टिक पतंग विक्रीवर नगरपालिकेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरातील पतंग विक्रेत्यांनी नॉयलॉन मांजासह प्लॅस्टिक पतंग विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

….विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार प्लॅस्टिकवर बंदी असतानाही शहरातील ठराविक भागात पतंग विक्रेते प्लॅस्टिक पतंगाची विक्री करीत असल्याचे दिसत आहे.

नायलॉन मांजा आणि प्लॅस्टिक पतंग विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर नगरपालिका कारवाई करुन पाच हजारांचा दंड वसूल करणार आहे.