राहता तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  राहाता तालुक्यातील करोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नसून त्यात वाढच होत आहे. तालुक्यात गेल्या 24 तासात पुन्हा 94 रूग्ण करोना बाधीत सापडले आहे.

राहाता तालुक्यातील करोना पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली असून दिवसभरात 94 जण तपासणीत बाधीत सापडले आहे. यात सर्वाधिक 19 रूग्ण शिर्डीत तर 17 रूग्ण राहाता शहरात सापडले आहे.

लोणीत 15 रूग्ण, सावळीविहीर 7 रूग्ण, पुणतांबा 6, त्याचबरोबर कोल्हार, वाकडी, साकुरी, राजुरी, प्रवरानगर, बाभळेश्वर, निर्मळ पिंप्री, नांदुर्खी, केलवड, एकरुखे या गावातही रूग्ण सापडले आहे.

आतापर्यंत तालुक्यात 62 जणांचे या आजाराने बळी घेतले आहे. वाढती रूग्णसंख्या पाहता शिर्डीत 150 खाटांचे रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करून संस्थानच्या डॉक्टरांच्या मदतीला सरकारी तसेच खासगी डॉक्टर नेमण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.

आठ दिवसात हे सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल. सध्या राहाता तालुक्यात शिर्डी साईआश्रम फेज 2, कोवीड हॉस्पीटल लोणी व राहाता येथील खाजगी मैड हॉस्पीटलमध्ये रूग्णांवर उपचार केले जात आहेत, अशी माहीती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर