रात्रीच्या अंधारात बसविलेला पुतळा पोलिसांनी तात्काळ हटविला

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व्हावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिक करत होते.

त्यासाठी श्रीरामपुरात आंदोलनही झाले. काही शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या पहाटे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा अचानक बसवला.

मात्र पोलीस प्रशासनाला कळताच त्यांनी तातडीने पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सकाळी हा पुतळा या ठिकाणाहून हलवून सुरक्षित ठिकाणी रवाना केला.

गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवावा,अशी मागणी होत आहे.

शिवजयंतीच्या पहाटे कुणीतरी अज्ञात शिवभक्तांनी या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आणून तो शिवाजी चौकात बसविला. या पुतळ्याच्या चौथर्‍यावर शिवप्रहार प्रतिष्ठान असे नाव लिहिलेले आहे.

अचानकपणे शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविल्याचे समजताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह तातडीने शिवाजी चौकात हजर झाले. त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना या ठिकाणी बोलावले.

पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेत तातडीने या ठिकाणाहून हा पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवला. भल्या पहाटे पुतळा बसविण्यात आला आणि दिवस उजडत असताना हा पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवल्याने याबाबत अनेक जण अनभिज्ञच होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|