कोरोनाची लक्षणे झाली अपडेट; जाणून घ्या नवीन लक्षणांबाबत

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-सध्या संपूर्ण भारतात करोनामुळे भीतीचं वातावरण आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून सगळे जण घाबरलेले आहेत.

कधीही करोना आपल्या आसपास येऊन आपल्यावर कोसळू शकतो या भीतीने जनता भयभीत झाली आहे.

त्यात करोनाची लक्षणे सुद्धा अपडेट झाली आहे. करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत.

नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणे, भूक न लागणे आदींचा समावेश आहे.

जागतिक आरोग्या संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या मते, वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसत आहेत.

ही लक्षणे एखाद्या व्यक्तीस विषाणूच्या संसर्गाच्या 5-6 दिवसांनी दिसतात. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे 14 दिवसांपर्यंत देखील नोंदविली गेली आहेत.

नवीन प्रकरणांबाबत भारतात केलेल्या अभ्यासानुसार बदलत्या स्ट्रेनमुळे लक्षणेही बदलत आहेत.

आता फक्त ताप, थकवा किंवा कोरडा खोकला, चव आणि गंध जाणे ही करोनाची लक्षणे राहिलेली नाहीत.

नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, मळमळ, उलट्या आणि सर्दी तसेच स्नायू दुखणे, लैंगिकदृष्ट्या अकार्यशील, अशक्तपणा, भूक कमी होणे यांचा समावेश आहे.

ताप आणि खोकला यासारख्या सामान्य लक्षणांनंतरही टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह येत आहे.

लक्षणं न दिसण्याच्या आणि तात्काळ निदान न होण्याच्या कोरोनाच्या गुणधर्मामुळे याचा सर्वात वेगानं प्रसार होतोय.

त्यातच आता कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|