भारताच्या कोरोना संकटासंदर्भात अमेरिकेने व्यक्त केली चिंता

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात भारतात निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीची तीव्रता लक्षात घेत अमेरिकेने चिंता आणि सहानुभूती व्यक्त केली.

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी भारताला कोरोनाच्या दुस-या लाटेशी सामना करण्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले, ” कोरोनाच्या भयानक प्रकोपात सापडलेल्या भारतीयांप्रती आम्हाला सहानुभूती आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत.

भारतात असलेल्या आमच्या सहकाऱ्यांसोबत आम्ही कार्यरत असून लवकरात लवकर भारताच्या आरोग्य योद्ध्यांसाठी अतिरिक्त मदत पाठविणार आहोत.” जेक सुलिवान यांनी म्हटले आहे की, भारतात निर्माण झालेल्या कोरोना संकटामुळे अमेरिका चिंतीत आहे.

भारतात सर्व प्रकारची सामग्री त्वरित पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. भारतात नागरिक मोठ्या धैर्याने कोरोनाशी सामना करीत आहेत. अजून मदत लवकरच पाठविण्यात येईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|