अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- अकोले तालुक्यातील सुगाव येथील ऑक्सिजन बेड कोविड केअर केंद्र सुरु करण्याकामी शिक्षकांचे भरीव योगदान लाभत आहे.
अवघ्या सात ते आठ दिवसात १३ लाख रुपयांची रक्कम शिक्षकांनी उभी केली. या निधीच्या माध्यमातून अकोलेत ६० ऑक्सिजन बेड असलेले कोविड केंद्र होणार सुरु आहे.

दरम्यान सर्वच बेड ऑक्सिजन युक्त असणारे राज्यातील हे पहिलेच कोरोना केंद्र असणार आहे. आणि हि अकोले करांसाठी अभिमानाचीबाब आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी कोरोना केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी पण पाहणी केली तसेच आवश्यक सूचना केल्या.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्नासाठी उपयुक्त असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र इंजेक्शनची तीव्र टंचाई काळात आमदार डाॅ. किरण लहामटे
यांनी प्रयत्न करून ४८ रेमडेसिविर मोफत उपलब्ध करून दिले. तहसीलदार मुकेश कांबळे, डाॅ. अजित नवले व डॉ. ज्योती भांडकोळी यांचेकडे रेमडेसिविर इंजेक्शन सुपूर्त करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













