अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या व आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे. दरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जामखेड तालुक्यातील बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक व साकत ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड पुढे ढकलली आहे.
त्यामुळे तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड होत आहे. त्यानुसार दि. ९ रोजी २४ ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणूक होणार गावे अशी आहेत कुसडगाव, देवदैठण, सोनेगाव, पाटोदा, तेलंगसी, डोणगाव, पाडळी, चोंडी, धानोरा, अरणगाव, नायगाव, नाहुली, दिघोळ, पोतेवाडी, खर्डा, पिंपळगाव आळवा,

पिंपळगाव उंडा, कवडगाव, जातेगाव, चोभेवाडी, सातेफळ, झिक्री, वाघा, मोहा दि.१० रोजी सरपंच निवड गावे पुढीलप्रमाणे बाळगव्हाण, मोहरी, राजेवाडी, धोंडपारगाव, घोडेगाव, खुरदैठन, तरडगाव, पिंपरखेड, धामणगाव, नान्नज, गुरेवाडी, आघी, खांडवी, जवळके, आपटी, सारोळा, लोणी, बोरले, आनंदवाडी, जायभायवाडी, बावी, सावरगाव, बांधखडक या ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी निवड होणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved