रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा: सामान्य लोक देखील रिझर्व्ह बँकेत खाते उघडून सरकारच्या विशेष योजनेत लावू शकतात पैसे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सरकारी बाँडमधील रिटेल गुंतवणूकदार थेट आरबीआयमार्फत पैसे गुंतवू शकतील.

आरबीआय लवकरच यासाठी मार्गदर्शक सूचना आणणार आहे. यासाठी एक नवीन व्यासपीठही तयार केले जाईल. गुंतवणूतीच्या सर्व पर्यायांपैकी सरकारी बाँड हा देखील एक चांगला पर्याय आहे. सरकारी बॉन्ड्स गुंतवणूकीसाठी खूप सुरक्षित मानले जातात. यात सरकारी ग्यारंटी असते. या बाँडवर निश्चित व्याज आहे.

काय असतात सरकारी बॉन्ड :- बॉण्ड्स हे कंपनी आणि सरकारसाठी पैसे उभे करण्याचे एक साधन आहे. बॉण्ड्समधून जमा केलेले पैसे कर्जाच्या श्रेणीत येतात. आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी कंपनी ठराविक कालावधीत बॉंडमधून पैसे गोळा करते. सरकारही उत्पन्न आणि खर्चाचे अंतर कमी करण्यासाठी कर्ज घेते.

ते ही हे कर्ज बॉन्ड रूपातच घेते. जर गुंतवणूकदाराच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले तर हे बाँड अतिशय सुरक्षित मानले जातात. सामान्यतः 9 प्रकारचे बॉन्डस जारी होतात. 1.सरकारी बॉन्ड, 2.म्युनिसिपल बॉन्ड 3. कोर्पोरेट बॉन्ड 4. सिक्योर बॉन्ड 5. इनसिक्योर बॉन्ड 6. ज़ीरो कूपन बॉन्ड . 7 प्रपैचुअल बॉन्ड 8.इनफ्लेशन बॉन्ड 9. कंवेर्टिबल बॉन्ड

आता आपण आरबीआय मध्ये खाते उघडू शकता :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच किरकोळ गुंतवणूकदारांना सेंट्रल बँकेत गिल्ट किंवा जी-सेक खाती उघडण्यास परवानगी देईल, ज्यामुळे भारतातील बाँड बाजारांना नवीन उंचावर नेले जाईल.

आरबीआयचे म्हणणे आहे की लवकरच सामान्य गुंतवणूकदारही आरबीआयमध्ये खाते उघडण्यास सक्षम असतील. या नवीन प्लॅटफॉर्मचे नाव Retail Direct असे असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe