अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे यामुळे आता सर्वसेवा पूर्ववत होत आहे. याच धर्तीवर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.
यामुळे कोणता सिनेमा रिलीज होणार यासाठी प्रेक्षक देखील प्रतीक्षेत आहे. दरम्यान अभिनेता रणवीर सिंह याच्या आगामी ’83’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
दरम्यान या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 मधील विश्वचषक विजयाच्या प्रवासापर्यंतची कहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
माध्यमं आणि कलाविश्वात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार हा मल्टीस्टारर चित्रपट 25 जून 2021ला प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान एप्रिल महिन्यात खिलाडी कुमारचा ‘सुर्यवंशी’ आणि रमजानच्या दिवसांमध्ये सलमान खानचा ‘राधे’ प्रदर्शित होणार असल्याचं कळत आहे.
त्यामुळंच ’83’च्या प्रदर्शनाची तारीख 25 जूनपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved