अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- मागील महिन्यात बिनविरोध झालेल्या कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवेदिता दिलीप बोरुडे यांची तर उपसरपंचपदी सविता गोरक्ष खर्डे यांची – बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदावर आता महिला आल्याने ::. आता कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीवर महिलराज अवतरणार आहे.
सलग तिसऱ्या वेळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्डे-विखे एक्सप्रेस धावली. तूर्तास अँड. सुरेंद्र खर्डे गटाकडे सरपंचपद असणार आहे. तर उपसरपंचपद विखे गटाकडे राहणार आहे.
सरपंच व उपसरपंच पदावर दोन्ही महिला व सदस्य संख्याही महिलेची अधिक असल्याने कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये महिलराज अवतरणार आहे.
ग्रामपंचायत सदनामध्ये सरपंच पदाकरिता अँड. सुरेंद्र खर्डे गटाकडून निवेदिता दिलीप बोरुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यास सूचक म्हणून माजी सरपंच अँड. सुरेंद्र खर्डे होते.
उपसरपंच पदासाठी सविता खर्डे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यास मावळते उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे सूचक होते. दुपारी अडीच वाजता राहाता पं समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. गायकवाड यांनी दोन्ही जागेसाठी प्रत्येकी
एकच अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी निवेदिता बोरुडे तर उपसरपंचपदी सविता खर्डे बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, सरपंच व सदस्य उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved